about warli art

|
आदिवासी वारलि चित्र कला हि आदिवासि सस्न्क्रुतिचे जतन करुन ठेवनारि चित्रकला आहे. पुर्वी कुडाच्या भिन्तिवर माति आणि शेणाचा लेप देवुन त्यच्यावर चित्र काढलि जात आहे. ति पण फक्त लग्न समारम्भा पर्यन्त मर्यादित होति. आदिवसि वारलि चित्र कलेचि सुरवात लग्नाच्या चौका पसुन झालि. हि चित्रे बहेर च्या जगाला वारलि जमातितिल कलाकरामुळे मुळे प्रसिद्धि मिळालि म्हणुन त्याला वारलि चित्र असे नाव पडले. ठाणे जिल्हयातिल आदिवसि जमातित सर्रास हि चित्रे वापरलि जातात. अदिवासि समाजा मधे जेव्हा लग्न राहते तेव्हा लग्नाच्य पहिल्या दिवशी कुडाच्या भिन्तिला माति आणी शेणाचा लेप देवुन त्याच्यावर लग्न झालेल्या स्त्रिया (सुहासिन) ह्या त्या कुडाच्या भिन्तिवर लग्नाचा चौक काधतात, त्या चौका मधे अदिवासि समाजाचे देव देवता दाखवल्या जातात आणि तो पुर्ण झाल्यावर चादरिने तो चौक झाकुन ठेवतात. नन्तर गावतिल प्रतिष्ठित व्याक्ति (भगत) त्याचि पुजा करतात आणि नन्तर नवर देवाला त्या चौकाशि बसवुन त्याचि पुजा होते. असा प्रकारे लग्न समारम्भाला सुरवात होते. चौक हा तान्दळाच्या पिठानि काढला जातो आणि चौक कढण्या साठि विशिष्ट प्रकारचि काडि असते त्याल बाहरि म्हणतात. त्या काडिणे चौक कढला जातो.
आणि आत हि चित्रकला कापडावर, कागदावर उदयास आणलि जेणे करुन वारलि चित्रकला हि जास्त काळा पर्यन्त टिकुन ठेवता येयिल. वारलि चित्रा मधे सगले रन्ग हे नैसर्गिक रन्ग वापरले जातात. कापडावर लाल मातिचा लेप देवुन त्याच्या मधे मोहाचा चिक टाकुन नन्तर प्रक्रिया केलि जाते. त्या नन्तर चित्र काढन्यास सुरवात होते.
वारलि चित्रकला विशेषतः अदिवसि समाजतिल नाच, गोष्टि, दैन्दिन जिवन चक्र, चौक याचवर केलि जाते.
चित्र काढन्या साठिचे सहित्य – लाल माति, शेण, कापड, मोहाचा चिक, रन्ग.